आकाशाला विचारल एकदा ती गेली कुठे,
रडला आणि म्हणाला ती जायला तुझ्याकडे आलीच कुठे
मीच वेडा एकतर्फी प्रेम करत बसलो,
अपेक्षा नही ठेवल्या तरी विनाकारण तिच्यात फसलो
तीच बोलन तीच हसन रुतात गेला मनात,
चिर पाडून मनाला निघून गेली क्षणात
वारा शोधे सैरावैरा रस्ता पाहतो तिचीच वाट,
चिंता वाटे त्याना माझी आता कशी व्हावी भेटगाठ
तिला शोधता शोधता आता थकले माझे नेत्र,
ओठ ही नकळत जपतात तिच्याच नावाचे स्तोत्र...
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment